शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामात हलगर्जी; अव्वल कारकून निलंबित

By admin | Updated: February 19, 2017 02:10 IST

निवडणूक निर्णय अधिका-यांचा आदेश

मलकापूर, दि. १८- निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पूर्ण न करता हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल अव्वल कारकून जी.पी. गवई यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशचंद्र वानखेडे यांनी निलंबित केले. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी अधिकारी/कर्मचारी यांची चमूनिहाय नियुक्ती केली होती. अव्वल कारकून जी.पी. गवई (मंडळ अधिकारी संवर्ग) तहसील कार्यालय मलकापूर यांच्याकडे मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींसह इतरांच्या पासेस देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत तसेच वरिष्ठांचा आदेश न मानून निवडणूक कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशान्वये जी.पी. गवई यांना निलंबित केले असून, निलंबन काळात त्यांना मुख्यालय म्हणून नांदुरा तहसील कार्यालय देण्यात आले आहे. गवई या अगोदर दाताळा येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते.