कर्णधाराच्या अर्धशतकी खेळीने अकोला विजयी

By Admin | Updated: December 25, 2014 00:53 IST2014-12-25T00:53:11+5:302014-12-25T00:53:11+5:30

पुणे येथे लॉयर्स कप-२0१४ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा.

Akola won the toss and elected to bat | कर्णधाराच्या अर्धशतकी खेळीने अकोला विजयी

कर्णधाराच्या अर्धशतकी खेळीने अकोला विजयी

अकोला : कर्णधार अतुल सराग यांच्या बहारदार अर्धशतकी खेळीमुळे अकोला वरिष्ठ वकील संघाला बेळगाव वकील संघ ह्यबह्ण वर विजय मिळविता आला. पुणे येथे सुरू असलेल्या लॉयर्स कप-२0१४ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये अकोला वरिष्ठ वकील संघ ह्यअह्ण ने बेळगाव ह्यबह्ण संघाला पराभूत केले.
पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत अकोला बार असोसिएशनचे 'अ' आणि 'ब' असे दोन संघ सहभागी झाले आहेत. बुधवारी अकोला ह्यअह्ण संघाचा सामना बेळगाव ह्यबह्ण संघासोबत झाला. बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत १0२ धावांचे लक्ष्य अकोला संघासमोर ठेवले. अकोला संघाने प्रत्युत्तरात अवघ्या १५ षटकांतच लक्ष्य पूर्ण करीत विजय मिळविला. कर्णधार अतुल सराग याने नाबाद ५0 धावा काढल्या. पवन बाजारे याने १८ धावांचे योगदान दिले. पीयूष देशमुख याने नाबाद सहा धावा काढल्या. रूपेश इस्तापे याने सहा धावा काढल्या. सागर महल्ले याने नऊ धावांचे योगदान दिले. हेमंत मोहता, पवन बाजारे, सुमीत तिवारी, प्रशांत ठाकरे यांनी गोलंदाजीत आपले कौशल्य दाखविले. रविकांत ठाकरे, तुषार सिरसाट यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केले. संघाला प्रशिक्षक अँड. मुन्ना खान व संघव्यवस्थापक अँड. बाबूराव पवित्रकार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सामनावीर पुरस्कार कर्णधार अतुल सराग याला मिळाला. उद्या अकोला 'अ' संघाचा सामना अहमदनगर वकील संघासोबत होणार आहे.

Web Title: Akola won the toss and elected to bat