शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथे ३५ लाखांचा खतसाठा जप्त

By admin | Updated: June 22, 2014 01:55 IST

भरारी पथकाच्या सूचनेवरून अकोला कृषी विभागाची कारवाई.

अकोला : शहरापासून नजीकच असलेल्या, आपातापा मार्गावरील एका गोदामातून, शनिवारी रासायनिक (सिंगल सुपर फॉस्फेट व डीएपी) खतांच्या आठ हजार गोण्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या खताची किंमत ३४ लाख ४४ हजार रुपये एवढी आहे. एका कंपनीच्या गतवर्षीची उत्पादन दिनांक असलेल्या गोण्यांमधील खते, दुसर्‍या कंपनीच्या ताजी उत्पादन दिनांक असलेल्या गोण्यांमध्ये भरण्याचे बेकायदेशीर काम येथे केले जात होते. भरारी पथकाच्या सूचनेवरू न कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही कारवाई केली.
आपातापा मार्गावरील शंकरनगरला लागून साईबाबा वेअर हाऊसिंगचे १६ हजार चौरस फूट क्षेत्रावर गोदाम आहे. त्या गोदामातच खतांचा साठा ठेवलेला होता. गुजरात राज्यातील नंदेसरी येथील लिबर्टी फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या, ग्रो मोअर डबल हॉर्स या ह्यबॅ्रन्ड नेमह्णने विकल्या जाणार्‍या एसएसपी खताचा तो साठा होता. सदर कंपनीने ते खत सप्टेबर २0१३ मध्ये गोण्यांमध्ये भरले होते. सदर खत गुजरातमधीलच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या जून २0१४ ही उत्पादन दिनांक घातलेल्या गोण्यांमध्ये भरले जात होते. तिथेच गुजरातमधीलच सरदार ह्यबॅ्रन्डह्णचे डीएपी खतही आढळून आले. तेदेखील एका गोणीतून दुसर्‍या गोणीत भरण्यात येत होते.
कृषी विभागाच्या भरारी पथकाला सदर गोदामात खताचा अवैध साठा असल्याची सूचना मिळताच, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गिरीश नानोटी, भरारी पथकाचे पंचायत समिती कृषी अधिकारी गोपाल बोंडे, तालुका कृषी अधिकारी के. आर. चौधरी आदी अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाने गोदामावर छापा घातला.