शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाचे दोन कर्मचारी निलंबित

By admin | Updated: January 2, 2015 01:31 IST

कामचुकारपणा भोवला.

अकोला : शहरातील लघू व्यावसायिक, फेरीवाले यांच्याकडून दैनंदिन परवाना शुल्काची वसुली करण्यात कामचुकारपणा करणे बाजार विभागातील वसुली निरीक्षक दीपक शिरसाट यांना भोवले, तर कर्तव्यातील हलगर्जीपणा मनपाचे सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण यांच्या अंगलट आला. दोन्ही कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी बुधवारी जारी केले.शहराच्या रस्त्यालगत विविध साहित्याची विक्री करणारे लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालक, भाजी विक्रेत्यांकडून मनपाच्या बाजार वसुली विभागाकडून दैनंदिन परवाना शुल्क वसूल केले जाते. शहरात किरकोळ व्यावसायिकांची वाढती संख्या व बाजार विभागाचे तोकडे आर्थिक उत्पन्न लक्षात घेता, प्रशासनाने परवाना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर २0११ मध्ये अंमलात आणला. यामध्ये बाजारातील ओटे, जागेवर दुकान थाटणार्‍या व्यावसायिकांकडून दहा रुपये, तर हातगाडी, फेरीवाल्यांना पंधरा रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दैनंदिन परवाना शुल्काची वसुली करण्याची जबाबदारी असलेल्या दीपक शिरसाट यांनी वसुलीसाठी चक्क खासगी व्यक्तीची नियुक्ती केल्याची बाब उपमहापौर विनोद मापारी यांनी उघडकीस आणली. बाजार विभागाचे अधीक्षक हुंगे यांची दिशाभूल करीत संबंधित कर्मचारी मागील तीन वर्षांंंंपासून फक्त पाच रुपये, दहा रुपये याप्रमाणे लघू व्यावसायिकांकडून परवाना शुल्काची वसुली करीत असल्याचे समोर आले. प्रशासनाने लागू केलेल्या शुल्कवाढीपासून १ हजार ६0 दिवसांमध्ये प्रति पाच रुपयानुसार ८१ लाख ६२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा मुद्दा उपमहापौरांनी मांडला होता.संबंधित महापालिका कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यानुषंगाने प्रशासनाने वसुली निरीक्षक दीपक शिरसाट यांना निलंबित केले. मानधनावरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी कामबंद केल्यानंतर काही कंत्राटदारांनी मनपा आवारात साहित्याची तोडफोड केली होती. त्यावेळी सुरक्षा अधिकारी मुलसिंग चव्हाण कर्तव्यावर हजर नसल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्याची कारवाई प्रशासनाने केली.