शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
5
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
6
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
7
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
8
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
9
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
10
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
11
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
12
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
13
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
14
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
15
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
16
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
18
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
19
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
20
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा प्रशासनाने प्रस्तावित चार प्रमुख रस्ते वगळले

By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST

महापौर व उपमहापौरांकडून ६५0 कामांची वेगवेगळी यादी सादर

आशिष गावंडे / अकोला
शहरात मूलभूत विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून सत्तापक्षाने तब्बल ६५0 प्रस्ताव तयार केले. यामध्ये महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या दोन भिन्न प्रस्तावांची यादी प्रशासनाकडे जमा आहे. दोन्ही पदाधिकार्‍यांच्या प्रस्तावात साधम्र्य असून, एकाच कामांवर दोनदा निधीची तरतूद केल्याची माहिती आहे. प्रशासनाने या दोन्ही प्रस्तावातील चार प्रमुख रस्ते वगळून त्यांचा समावेश निव्वळ रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडुन प्राप्त १५ कोटींच्या निधीतून प्रस्तावित कामांमध्ये केला आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने २0 मार्च २0१३ रोजी अकोला मनपासाठी ८ कोटी तसेच ६ एप्रिल रोजी २0 कोटी असे एकूण २८ कोटी अनुदान मंजूर केले. या निधीतून नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक विकास कामे अपेक्षित आहेत. यापूर्वी सत्तापक्षाने २८ कोटींच्या अनुदानातून २ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन करणार्‍या कंत्राटदाराला देण्याचा ठराव मंजूर केला. उर्वरित २६ कोटींच्या निधीचे प्रस्ताव तयार करीत महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी स्वत:च्या दोन वेगवेगळ्य़ा याद्या तयार केल्या. दोन्ही याद्यांमिळून सुमारे ६५0 प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यापैकी एकाही यादीला सभागृहाची मंजुरी नाही, हे विशेष. अशास्थितीत सत्तापक्षाने तयार केलेल्या याद्यांमध्ये एकाच कामांचा दोनदा समावेश असून, यामध्ये काही प्रमुख रस्त्यांवर निधीची तरतूद केली आहे. यादरम्यान, शासनाकडून फक्त रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी प्राप्त झाले. या अनुदानातून मजबूत व गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करण्याचा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा मानस आहे. या भूमिकेतूनच डॉ.कल्याणकर यांनी सत्तापक्षाच्या दोन्ही याद्यांचे विस्तृत वर्गीकरण करीत २६ कोटींच्या प्रस्तावातून चार प्रमुख रस्ते वगळण्याचा निर्णय घेतला आहे.