शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकोला: खडकी परिसरात ११ ठिकाणी वीज चोरी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:21 PM

अधीक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांनी स्वत: या मोहीमेत पुढाकार घेत भरारी पथक व उपविभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वी केली आहे.

अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागाने खडकी परिसरात प्रत्येकी १ लाखापेक्षा जास्त वीज चोरी असणाऱ्या ११ ठिकाणी एकाच वेळी धाड टाकत वीज चोरी पकडली आहे. अधीक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांनी स्वत: या मोहीमेत पुढाकार घेत भरारी पथक व उपविभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई यशस्वी केली आहे.मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सतत वीज चोरीविरूध्द कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर अकोला शहर विभागाच्यावतीने नुकताच केलेल्या अकोट फैल नंतर खडकी परिसरातील ही त्यांची मोठी कारवाई आहे. विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत नियमानुसार वीज चोरीची रक्कम आणि दंड न भरल्यास त्यांच्यावर पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. यापुढे आकस्मिक आणि सतत कारवाई करण्याचे नियोजन महावितरण शहर विभागाने तयार केले आहे. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात प्रभारी कार्यकारी अभियंता शहर गणेश महाजन उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड, सहाय्यक अभियंते लहाने, ठोंबरे , बोरकरसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडहुक टाकून थेट वीज चोरी करणे किंवा घरगुती वापरासाठी वीज घेऊन तीचा व्यवसायासाठी वापर करणे यापेक्षाही पुढे जाऊन वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये मीटरमध्ये रेझिस्टंट बसवून रिमोट कंट्रोलचा वापर करून वीज चोरी करणे, मीटरच्या मागच्या बाजूला छिद्र पाडून सीटी ची वायर कट करणे, मीटर बायपास करणे, पुश बटन डॅमेज करणे जेनेकरून रिडींग दिसणार नाही, सीटी म्हणजेच करंट ट्रांन्झीस्टर शॉर्ट करणे जेणेकरून किती वीज वापरली याचा मोजमापच होणार नाही. याशिवाय मीटरमध्ये असलेल्या पीटीची वायर कट करणे असे अनेक अफलातून प्रकारातून वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण