शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडा

By Admin | Updated: January 2, 2015 00:27 IST2015-01-02T00:27:43+5:302015-01-02T00:27:43+5:30

उच्च शिक्षण विभागाचे आदेश.

Add Aadhar card to the bank account for scholarship | शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडा

शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडा

अकोला : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे विनाविलंब व सहज मिळावी यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा क्रमांक हा आधार कार्डच्या क्रमांकाशी जोडण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.
आधार कार्डचा उपयोग विविध योजनांमध्ये करण्यात येत आहे. आता शिक्षण विभागाने देखील आधार कार्डचा उपयोग करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीला आधार कार्डचा ह्यआधारह्ण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना एक परिपत्रक पाठवून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढण्यास प्रवृत्त करावे असे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत आधार कार्ड हे बंधनकारक नाही, मात्र आधार कार्डचा क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी जोडल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळणे सोपे जाऊ शकते. यासाठी आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून आप-आपल्या महाविद्यालयात आधार काडर्च कॅम्प लावावे असे देखील निर्देश परिपत्रकात आहेत.
केंद्र तसेच राज्याकडून मिळणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना विनाविलंब व कुठल्याही किचकट प्रक्रियेशिवाय मिळण्यासाठीचा विलंब टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. परिपत्रकानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाविद्यालयांनी शिक्षण विभागाला पाठवावा असे देखिल बजावण्यात आले आहे.

Web Title: Add Aadhar card to the bank account for scholarship