शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई अंगलट; अकोला मनपाच्या विरोधात पोलिस तक्रार

By admin | Updated: September 28, 2014 01:46 IST

जुने बस स्थानक प्रशासनाची धाव

अकोला : अतिक्रमणाच्या सबबीखाली टॉवर चौकातील जुन्या बस स्थानकाची आवारभिंत पाडणे महापालिका प्रशासनाला भोवण्याची चिन्हं आहेत. यासंदर्भात मनपाने कोणतीही लेखी पूर्वसूचना अ थवा नोटीस न देता कारवाई केल्यामुळे एसटी महामंडळाच्यावतीने मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.टॉवर चौक परिसरात एसटी महामंडळाचे आगार क्र.१ असून बस स्थानकाची आवारभिंत अतिक्रमित असल्याचा दावा करीत मनपाचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. या दरम्यान बस स्थानक परिसरात एसटी महामंडळाकडून अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांची दुकानेसुद्धा पाडण्यात आली; परंतु मनपाने ही कारवाई करण्यापूर्वी कोणतीही लेखी सूचना अथवा नोटीस दिली नसल्याचा आरोप आगार क्र.१ च्या प्रशासनाने केला आहे. जुन्या बस स्थानकाची जागा ही मनपाच्या नव्हे तर महसूल विभागाच्या अख त्यारित असून, जागेचा लिज करार संपल्याचे प्रकरण नागपूर हायकोर्टात प्रलंबित असल्याची माहिती आहे. अशास्थितीत मनपाने केलेली कारवाई आकसपोटी केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. यात भरीस भर आगार क्र.१चे व्यवस्थापक जी.टी.वरोकार यांनी मनपा प्रशासनाने एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसात नोंदवली आहे. या तक्रारीवर पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.