शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक द चेन नियमांचे पालन न करणाऱ्या २२१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST

मास्क न वापरणाऱ्या १९९ जणांना दंड, अकोला : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असल्याने पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात ...

मास्क न वापरणाऱ्या १९९ जणांना दंड,

अकोला : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असल्याने पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली असून रविवारी पहाटेपासूनच पोलिसांनी वीणा मास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सुमारे २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत; मात्र तरीही काही नागरिक या निर्बंधांना न जुमानता विनाकारण बाहेर फिरत असल्याचे समोर आले. नागरिकांनी विनाकारण फिरण्याचा सपाटाच सुरू केला. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक यासह केवळ लॉकडाऊन कशा प्रकारे आहे हे पाहण्यासाठी बाहेर नागरिक निघत आहेत. याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर कारवाई केली. त्यानंतर मास्क न वापरणाऱ्या १९९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ३ आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १९ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा प्रकारे एकूण २२१पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सुमारे २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.