शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विहिंपने जाळला आमीर खानचा प्रतीकात्मक पुतळा

By admin | Updated: January 1, 2015 01:40 IST

पीके चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी.

अकोला: पीके चित्रपटामध्ये हिंदू देवता व साधू-संतांचा अपमान होईल, असे चित्रीकरण व संवाद साधून धार्मिक भावना दुखावल्याने बुधवारी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वसंत चित्रपटगृहासमोर निदर्शने केली आणि पीके चित्रपटातील अभिनेता आमीर खान याच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर सायंकाळी आमीर खानच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. विहिंपने दिलेल्या निवेदनामध्ये पीके हा चित्रपट वादग्रस्त असून, या चित्रपटावर शासनाने बंदी घालून अभिनेता व दिग्दर्शकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या चित्रपटामध्ये हिंदू देवता व साधूंवर विडंबनात्मक संवाद सादर केले आहेत. हिंदू संस्कृतीवर आक्षेपार्ह चित्रीकरण व संवाद साधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी आणण्याची मागणी विहिंपने केली. बुधवारी सायंकाळी वसंत चित्रपटगृहासमोर विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोरदार नारेबाजी केली आणि आमीर खानच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. यावेळी कोतवाली पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांच्या दबावाला बळी न पडता, कार्यकर्त्यांनी पुतळय़ाचे दहन केले.