९६ हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: June 5, 2014 00:09 IST2014-06-05T00:07:38+5:302014-06-05T00:09:34+5:30

आकोट शहरात ९६ हजार रुपयाच्या हजारांचा गुटखा जप्त.

961 thousand gutkha seized | ९६ हजारांचा गुटखा जप्त

९६ हजारांचा गुटखा जप्त

आकोट : शहरात विमल पुड्यांची सर्रास विक्री सुरू असून अशा ९६ हजार रुपयाच्या विमल पुड्या बाळगणारास आकोट पोलिसांनी बुधवार ४ जून रोजी ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी आपल्या पथकासह शहरातील याकुबपुरा परिसरात छापा मारला असता म. रियाज म. युसुफ याचेकडे १६ हजार विमल गुटखा व विमल पान मसालाच्या पुड्या आढळून आल्या.या पुड्यांची किंमत ९६ हजार रुपये आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब श्रीकृष्ण वाकडे यांचे तक्रारीवरून आकोट पोलिसांनी म. रियाज याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 961 thousand gutkha seized