शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख १६ हजार हेक्टरवरील पिके बाधित

By admin | Updated: November 21, 2014 02:16 IST

दुष्काळी परिस्थिती: जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल पाठविला शासनाकडे

अकोला: यावर्षीच्या पावसाळय़ात अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला आहे. या अहवालानुसार खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल ४ लाख १६ हजार ७८६ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची बाब समोर आली आहे.यावर्षीच्या पावसाळय़ात उशिरा आलेला पाऊस आणि अल्प पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्हाधिकार्‍यांकडून गेल्या शनिवारीच जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची सरासरी पैसेवारी ४१ पैसे म्हणजेच ५0 पैशांच्या आत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव समोर आले. पैसेवारी कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांच्या तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी शासनाकडे पाठविला. या अहवालानुसार २0१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९६ हेक्टर ५५ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती व बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत लाखो हेक्टरवरील पिके हातून गेल्याने, जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना फटका बसला. नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.