शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

विषय मंजूर करण्यासाठी २४ लाखांत ‘सेटिंग’!

By admin | Updated: July 16, 2015 01:38 IST

अकोला मनपातील प्रकार; ४८ नगरसेवकांचे खिसे भरले?

अकोला: तब्बल ५0 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित केल्या जाणार्‍या स्थगित सर्वसाधारण सभेतील महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी ४८ नगरसेवकांची जुळवाजुळव करीत २४ लाखांत ह्यसेटिंगह्ण केल्याची माहिती आहे. बुधवारी महापौरांच्या दालनात पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत केवळ आर्थिक विषयावर चर्चा झाली. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी जीआयएस प्रणाली कार्यान्वित करणे, सात सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाला मंजुरी देणे, शहर बससेवा सुरू करणे, तसेच मोर्णा धरणापासून काटेपूर्णा प्रकल्पापर्यंत नवीन जलवाहिनीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २७ मे रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. नगरसेवकांच्या संख्याबळाअभावी ही सभा स्थगित करावी लागली होती. ५0 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर सत्तापक्ष भाजपने अंतर्गत कलहाला पूर्णविराम देत, सभेतील विषयाचे अर्थपूर्ण नियोजन केल्याची चर्चा आहे. मागील आठवडाभरात मनोमिलनाचे सोपस्कार पार पडल्यानंतर सभेचा मुहूर्त (१६ जुलै) निश्‍चित करण्यात आला. अर्थातच, पक्षातील नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांची मर्जी सांभाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले. याकरिता ४८ नगरसेवक निश्‍चित होऊन, त्यांना विषयानुसार प्रत्येकी ५0 हजार रुपयांचा मोबदला अदा केला जाणार आहे. विकास कामांचा दर्जा कसा राहील, यावर चर्चा करण्यापेक्षा खिशात किती रक्कम जमा होईल, यावरच गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.