शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान

By admin | Updated: August 1, 2014 02:24 IST

पावसाचा तडाखा : अकोला जिल्हा प्रशासनाचा अंदाज

अकोला : गेल्या आठवड्यात दोन दिवस झालेल्या संततधार पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ११ हजार १८२ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये खरवडून गेलेल्या शे तीसह पीक नुकसानीचा समावेश आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्या वीस दिवसांपासून रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती. तसेच त्यामध्ये गेल्या २२ आणि २३ जुलै रोजी संततधार पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला होता. पाऊस आणि पुरामुळे नदीकाठची शेतजमीन खरवडून गेली. तसेच पेरणीनंतर उगवलेल्या खरीप पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. शेती पिकांसह शेतजमीन खरवडून गेल्याने, जिल्ह्यात ११ हजार १८२ हेक्टर शे तीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, खरवडून गेलेल्या शेतीसह पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम संबंधित तालुका स्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १६६ गावांना पावसाचा तडाखा; ७४७ कुटुंब बाधित !संततधार पाऊस आणि पुराचा जिल्ह्यात १६६ गावांना तडाखा बसला असून, ७४७ कुटुंब बाधित झाली आहेत. तसेच जिल्ह्यातील अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच तालुक्यात १६ घरांचे पूर्णत: आणि ९४६ घरांचे अंशत: नुकसान झाले तर ६१ मोठय़ा जनावरांसह २१ लहान जनावरांचा मृत्यू झाला असून, तेल्हारा तालुक्यात १ लाख ५0 हजारांच्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.*मदतीची प्रतीक्षा! पाऊस आणि पुरामुळे खरवडून गेलेली शेती, पिकांचे झालेले नुकसान आणि घरांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू असून, नुकसानभरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.*खरवडून गेलेली शेती वपिकांचे असे आहे नुकसान!तालुका                 हेक्टरअकोला                  ७९0आकोट                 ४९३९तेल्हारा                 ४000बाळापूर                 १४५३एकूण                  १११८२