शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

जामखेडमध्ये तीन मोटारसायकल चोरांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:38 PM

जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला. या ग्रामस्थांपैकी एकाने चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् सर्व सूत्रे हालली. ग्रामस्थांनी मोटारसायकलवरील तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी चौकशीत तिघांकडून चार चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर (सौताडा ) ...

जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला. या ग्रामस्थांपैकी एकाने चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् सर्व सूत्रे हालली. ग्रामस्थांनी मोटारसायकलवरील तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी चौकशीत तिघांकडून चार चोरीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. रामेश्वर (सौताडा ) येथून तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारी एका मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होते. सौताडा घाटातून जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना त्यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. गाडी पडल्यामुळे घाटात त्यांच्या मदतीसाठी काही लोक थांबले. यावेळी जमलेल्या लोकांमधील एकाने आपल्याच गावातील माजी सैनिक बजरंग डोके यांची चोरीला गेलेली गाडी ओळखली. अन् डोके यांना फोन केला की तुमच्या गाडीचा अपघात झालाय. यावेळी डोके यांनी माझी गाडी दोन दिवसांपूर्वीच चोरीला गेली असून त्या पोरांना धरून ठेवा असे सांगताच त्या जमलेल्या लोकांनी त्या मुलांना धरून ठेवले. यावेळी डोके व पोलीस एकाच वेळी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलिसी खाक्या दाखवताच मुलांनी अजून चार गाड्या चोरल्याची माहिती दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrimeगुन्हाPoliceपोलिसJamkhedजामखेड