शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय म्हणतात, मी कोणत्याच पक्षाचा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:32 PM

मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. 

केडगाव : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची पुरती वाताहात झाली आहे. लोक माझ्याकडे अडचणी घेऊन येतात. मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र आणि शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित डॉ. विखे पा. मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळद घाट यांच्या संयुक्त विद्यमाने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते.विखे म्हणाले, नगर तालुक्यासारख्या जिरायत भागातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्याचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. आरोग्य शिबिरासाठी दोन वर्ष सर्वे केला. वर्षभरात ७५ शिबिरे घेणार आहे. अल्पदरात सेवा देणारे रुग्णालय महणजे विखे हॉस्पिटल आहे, असे डॉ. सुजय विखे म्हणाले.यावेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, मनोज कोकाटे, दत्ता पाटील नारळे, विनायक देशमुख,अशोक कोकाटे, बाळासाहेब हराळ, केशव बेरड, दत्तात्रय सदाफुले, आबासाहेब कोकाटे, सरपंच अंजना पवार, शरद पवार, संजीवन गडाचे भारती महाराज, अर्चना चौधरी, राजेंद्र कोकाटे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, बाबासाहेब काळे, संजय गिरवले, अशोक मोरे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील