शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

आता संशोधनातील गैरप्रकाराला बसणार आळा-डॉ.भूषण पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 2:58 PM

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन  शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याला आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

संडे मुलाखत /चंद्रकांत शेळके । अहमदनगर : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन  शनिवारी न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याला आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. बोगस संशोधनाचे प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यावर यूजीसीने काय भूमिका घेतली?यूजीसी शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिपूर्ण प्रयत्न करत आहे. बोगस संशोधनाला आळा बसावा म्हणून आयोगाने शैक्षणिक संशोधन आणि नितीशास्त्र संघाची स्थापना केलेली आहे. देशातील सर्व सरकारी शिक्षण परिषदा, राष्ट्रीय अकादमी या संघाच्या सदस्य आहेत. या संघाकडून नियतकालिकांची जी यादी दिली आहे, त्यात प्रकाशित होणाºया संशोधनालाच ग्राह्य धरले जाणार असल्यामुळे संशोधनातील गैरप्रकाराला पूर्णपणे आळा बसेल.

गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे?प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालयांना रिक्त जागा भरण्याबाबतचा निर्धारित कार्यक्रम  यूजीसीने ठरवून दिलेला आहे. परंतु यात राज्य सरकारचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच पाहिजेत. त्यात केवळ यूजीसीचा पुढाकार असून चालणार नाही, तर केंद्र व राज्य सरकार  यांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवायला हवा. कौशल्याधारीत विषय कोणते? नियमानुसार यूजीसी कौशल्य विकासासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांना अनुदान देते. परंतु कौशल्य म्हणजे नुसती कारागिरी नव्हे, तर प्रत्येक विषयात कौशल्य शोधण्याची गरज आहे. उदा. बी.ए. इंग्रजीमध्येही कौशल्य आहे. ते कसे फुलवायचे व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे हे महाविद्यालायांनी ठरवले तर तो विषयही कौशल्यधारित होईल. त्यासाठी निकालावर आधारित ३० अभ्यासक्रमांची यादी यूजीसीच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. त्याचा संदर्भ विद्यापीठ, महाविद्यालयांना घेता येईल. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी केवळ ज्ञानकेंद्रित न होता रोजगारक्षमही होतील, अशी अपेक्षा. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत