शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

आंतरजातीय विवाह केल्याने मामाने भाचीला केली बेदम मारहाण; जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 5:52 PM

भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड : भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा जामखेड शहरातील मेनरोडवरील एका जनरल स्टोअर्ससमोर आरोपीची भाची तिच्या नणंदेसह उभी होती. त्यावेळी आरोपीने भाचीच्या नणंदेचा हात पकडत ‘तुझ्या भावाने माझ्या भाचीला पळवून नेले आहे, आता मी तुला पळवतो’, असे म्हणत ओढले. तसेच दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर दोघींनी रात्री जामखेड पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.संबंधित तरुणी हीचे जामखेड शहरातील एका तरुणावर प्रेम होते. दोघांनीही आळंदीला जाऊन आंतरविवाह केला. २१ जून रोजी दोघांनीही नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर संबंधित आरोपी वारंवार मुलाच्या नातेवाईकांना धमकी देत होता. त्याच्या धमकीला कंटाळून भाचीच्या सासरच्या लोकांनी संबंधित आरोपीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही तक्रार देण्यात आली होती. रविवारी आरोपीने भाचीसह तिच्या नणंदेलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी. आय. गव्हाणे हे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड