शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

एप्रिल अखेर रोगराई संपेल, यंदा धनधान्यही मुबलक होईल, राजकारणी प्रबळ होतील, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:29 AM

 गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी  बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शिर्डी:  गुढी पाडव्यानिमित्त साईदरबारी  बुधवारी (दि.२५ मार्च) सुर्योदयाला संवत्सर फलाचे वाचन करण्यात आले. यात एप्रिल अखेरपर्यंत रोगराई संपण्याचा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे.साईमंदिराच्या सुवर्ण शिखरावर बुधवारी सुर्योदयाला गुढी उभारण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व अंजली डोंगरे यांच्या हस्ते गणपती, वरूण यांच्यासह ब्रम्हध्वजाची  पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. या विधीचे पौरोहित्य बा. रा. जोशी यांनी केले. यावेळी बोरकर गुरूजी, सुनील तांबे उपस्थित होते.स्वच्छ केलेल्या वेळूच्या काठीवर केशरी रंगाचे नवीन वस्त्र, चांदीचा कलश, लिंबाचा डहाळा इत्यादी बांधून ब्रम्हध्वज शिखराच्या पूर्व बाजूस बांधण्यात आला. त्याची विधीवत पूजा करून लिंबाचा फुलोरा, हिंग, मिरे, गूळ आणि चिंच यांच्या मिश्रणाचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला.सध्या मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट लवकर निवारण करून देशाबरोबरच जगभरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, यासाठी अरूण डोंगरे व अंजली डोंगरे यांनी साईबाबांना साकडे घातले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने  साईबाबांच्या मूर्तीवर सुवर्णालंकार, सुवर्ण मुकूट घालण्यात आला. याशिवाय  साखरेच्या गाठी कड्यांचा हारही घालण्यात आला.गुढी पाडव्याला नवीन मराठी वर्ष सुरू होते. यावेळी गुढी पूजनानंतर आगामी वर्षाचे भाकीत वर्तवले जाते. बुधवारी पुरोहित बाळासाहेब जोशी यांनी याबाबत सांगितले की, सध्या सुरू असलेली रोगराई एप्रिलअखेर संपण्याचा संभव आहे. यंदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र फळे, फळभाज्या व धनधान्य मुबलक होईल. मात्र ते तयार झाल्यावर उंदीर, टोळधाड, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे. यंदा आगीपासून भय असून वणवे पेटतील. जनावरांना रोगराई वाढेल. त्याचा प्रादूर्भाव माणसांना होईल. राजकारणी प्रबळ होतील, असा अंदाज यंदाच्या संवत्सर फलात वर्तविण्यात आला आहे.यंदा भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सर्व विधी पारंपरिकपणे मात्र भक्तांच्या अनुपस्थितीत एकांतात सुरू आहेत. पाडव्याच्या निमित्ताने शहरातून रात्री काढण्यात येणारी रथ मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाgudhi padwaगुढीपाडवा