शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

कोपरगावातील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; दोन महिन्यानंतर दुसरा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:05 PM

मागील आठवड्यात लोणी येथील रहिवासी व कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील लिपीक कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी (दि.४) रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.

कोपरगाव : मागील आठवड्यात लोणी येथील रहिवासी व कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील लिपीक कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी (दि.४) रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी दिली.      राहाता तालुक्यातील लोणी येथील बाधित व्यक्ती मागील आठवड्यात कोपरगाव येथील महिला डॉक्टर यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आली होती. त्यानंतर काही दिवसांनी लोणी येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्याच्या संपर्कात आलेल्या कोपरगाव येथील १३ व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एक महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्या.

   कोरोनाबाधित महिला डॉक्टर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा प्रशासनाच्या वतीने शोध सुरु आहे. तब्बल दोन महिन्यानंतर कोपरगावात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

 दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या डॉक्टर महिलेने खासगी लॅबला टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याचीही माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

 दरम्यान कोपरगाव शहरातील काही बाधितक्षेत्र घोषित करण्यात आला असून तो सील केला आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगावdoctorडॉक्टर