शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अहमदनगरच्या महापौरांनी मंजूर केला श्रीपाद छिंदमचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 2:54 PM

अहमदनगरच्या महापौर सुरेखा कदम यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर केला आहे.

अहमदनगर - अहमदनगरच्या महापौर सुरेखा कदम यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा उपमहापौर श्रीपाद छिंदमचा राजीनामा मंजूर केला आहे. श्रीपाद छिंदमचा राजीनामा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. आयुक्तांकडून हा राजीनामा आता विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.  

नेमके काय आहे प्रकरण?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी (16 फेब्रुवारी) भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली.  छिंदमनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने अहमदनगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता छिंदमला अटक केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला शनिवारी सकाळी 8 वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने छिंदमला 1 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याचे तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.  

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करावे- खा. संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणा-या श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीने खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजे 

‘कोणत्याही व्यक्तीने बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची, पात्रता पाहावी. आपण कोणाबद्दल बोलतोय, याचा विचार केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रीपाद छिंदमच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमBJPभाजपा