शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ जुलैला अध्यादेश काढला आहे. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती ...

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ जुलैला अध्यादेश काढला आहे. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाची परवानगी दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दीड महिन्यापूर्वीच ३१ मार्च २०२१ या अर्हता दिनांकानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार केलेली आहे. आता ग्रामविकास विभागाने बदल्यांना परवानगी दिल्याने जिल्हा परिषदेकडून बदल्यांसाठी समुपदेशनाची प्रक्रिया राबवून बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही सुरू केली असून विभागनिहाय बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

शिक्षक वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वर्ग ३ व ४च्या बदल्या होणार आहेत. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

---------------

बदल्यांचे वेळापत्रक

दिनांक वेळ विभाग

२० जुलै १० ते १ सामान्य प्रशासन

दु. २ ते ४ अर्थ विभाग

दु. ४ ते ६ कृषी विभाग

२१ जुलै १० ते २ महिला व बालकल्याण विभाग

दु. ३ ते ६ पशुसंवर्धन विभाग

२२ जुलै १० ते ११ लघू पाटबंधारे विभाग

११ ते १२ ग्रामीण पाणीपुरवठा

दु. २ ते ६ बांधकाम विभाग

२४ जुलै १० ते १ शिक्षण विभाग

दु. २ ते ६ आरोग्य विभाग

२५ जुलै १० ते ६ आरोग्य विभाग

२६ जुलै १० ते ६ ग्रामपंचायत विभाग

---------------

तालुकास्तरीय बदल्या २८ व २९ रोजी

जिल्हा परिषद मुख्यालयातील बदल्या २६ जुलैपर्यंत उरकल्यानंतर तालुका स्तरावरील बदल्या २८ व २९ रोजी होणार आहेत. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास त्यास संबंधित खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व्यक्तीश: जबाबदार राहतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बदली आदेशात म्हटले आहे.