शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांच्या लाभांपासून कामगार वंचित

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

अहमदनगर : बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ प्रत्यक्षात मात्र

अहमदनगर : बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ प्रत्यक्षात मात्र, या लाभार्थ्यांना या योजनांचा योग्य वेळेत लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे़ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त कामगारांचे विविध लाभाचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत़ विशेष म्हणजे या अर्जांची गेल्या वर्षभरापासून छाननीही झालेली नाही़ कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या १६ योजना राबविल्या जातात़ जिल्ह्यातील ३६ हजार ७६१ बांधकाम कामगारांची येथील कार्यालयात नोंदणी आहे़ मार्च २०१५ मध्ये एकूण २५०० प्रस्तांवाना मंजुरी देत लाभ देण्यात आला़ त्यानंतर मात्र, या कार्यालयात आलेल्या प्रस्तावाची छाननीही झालेली नाही़ येथील कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर निधीला मंजुरी मिळते़ गेल्या दीड वर्षांत आलेले प्रस्ताव अजूनपर्यंत शासनाकडे पाठविले नसल्याचे समोर आले आहे़ कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पत्नीस शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वर्षाला साडेतीन हजार, शैक्षणिक सहाय्य, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतीवर्षी एक हजार, दहावी व बारावीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास पाच हजार प्रोत्साहनात्मक सहाय्य, संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या पाल्यास शुल्काची परिपूर्ती, कामगाराचा कामावर असल्यास मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य, कामगार त्याची पत्नी किंवा पाल्याला गंभीर आजार असल्यास २५ हजार वैद्यकीय सहाय्यसाठी, प्रसूतीसाठी १० ते १५ हजार रुपये अशा विविध योजना कामगारांच्या कल्याणासाठी राबविल्या जातात़ (प्रतिनिधी)