प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजाविणाऱ्या आशासेविकांचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:47+5:302021-07-26T04:21:47+5:30

केडगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आशासेविकांनी अतुलनीय योगदान दिले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात ...

The work of the hopefuls in duty under adversity is commendable | प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजाविणाऱ्या आशासेविकांचे काम कौतुकास्पद

प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजाविणाऱ्या आशासेविकांचे काम कौतुकास्पद

केडगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आशासेविकांनी अतुलनीय योगदान दिले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी काम केले. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नसून संभाव्य तिसऱ्या लाटेतही आशासेविकांची कसोटी लागणार आहे. अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या आशासेविकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दिली.

नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आशासेविकांना अत्यावश्यक असणारे मेडिकल किटचे वाटप प्रा. गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक जॉर्ज डिओबिया, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, झोडगे, शिवसेना नेते संदीप गुंड, माजी पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, प्रवीण कोकाटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, महेश वाघ, गणेश गुंड, प्रसाद पवार, जालिंदर शिंदे, अविनाश पवार, अशोक ढगे, अजय बोरुडे, विलास शेडाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांगुने, डॉ. शेंदुरकर, डॉ. दातीर, टाकळी काझी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नागरदेवळे व दरेवाडी गटातील सर्व आशासेविका उपस्थित होत्या.

250721\img-20210725-wa0218.jpg

फोटो टाकळी काझी

Web Title: The work of the hopefuls in duty under adversity is commendable