शहरातील विद्यार्थ्यांचे स्वागत

By Admin | Updated: June 17, 2016 23:37 IST2016-06-17T23:27:19+5:302016-06-17T23:37:46+5:30

अहमदनगर : उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नवीन कपडे, बूट, दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात गेला.

Welcome to the city's students | शहरातील विद्यार्थ्यांचे स्वागत

शहरातील विद्यार्थ्यांचे स्वागत

अहमदनगर : उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे शाळेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नवीन कपडे, बूट, दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात गेला. शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शहरात विविध शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक अनिल पुंड, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दुगड, समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या संध्या कुलकर्णी, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे गोरक्षनाथ भोर, अनघा चेम्बूरकर, रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे सुधाकर मोहिते, सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या रूक्मिणी नन्नवरे, आनंद विद्यालयाच्या शारदा पोखरकर, रेसिडेन्सियल हायस्कूलचे उल्हास दुगड, महाराष्ट्र बालक मंदिरचे सुरेश शेवाळे, किशोर संस्कृत संवर्धिनी प्राथमिक शाळेचे विठ्ठल लोखंडे, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे एन.ए. भावसार, यशश्री अ‍ॅकॅडमीचे सिरिल पंडित, नॉर्थस्टार ग्लोबल अ‍ॅकॅडमीच्या संध्या तिवारी, कै.वि.ल.कुलकर्णी विद्यालयाच्या एस.व्ही. धिमते, प्रगत विद्यालयाचे सुनील पंडित, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालाच्या भारती कुलकर्णी, श्री साई इंग्लिश मिडियम स्कूलच्या आर.सिंग मॅडम. या सर्वांनी या उपक्रमास सहकार्य करून लोकमत बालविकास मंचसोबत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Welcome to the city's students