आम्ही तुमचे भाऊ, तुमच्या पाठीशी उभे राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:00+5:302021-08-25T04:27:00+5:30

नेवासा तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने शारदा फाऊंडेशनच्या सहकार्याने बाजार समितीजवळील जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित ...

We will stand behind you, brother | आम्ही तुमचे भाऊ, तुमच्या पाठीशी उभे राहू

आम्ही तुमचे भाऊ, तुमच्या पाठीशी उभे राहू

नेवासा तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने शारदा फाऊंडेशनच्या सहकार्याने बाजार समितीजवळील जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. कविता जाधव, जया आढाव या महिलांनी आपल्या मनोगतात महिलांच्या वतीने अडचणी मांडल्या. उपसभापती किशोर जोजार यांनी संवेदनशील विषय हाती घेतल्याबद्दल पुनर्वसन समितीचे कौतुक केले. जिल्हा समन्वयक अशोक कुटे यांनी प्रास्ताविकात एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्याचा आढावा घेतला. तालुका समन्वयक कारभारी गरड यांनी बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, फी माफीचा प्रस्ताव याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी माजी सभापती सुनीता गडाख यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भास्कर नरसाळे, अरुण वल्ले, भारत आरगडे यांनीही बचत गटाबद्दल सविस्तर माहिती दिली. शेवटी महिलांची अभ्यासपूर्ण बैठक घेऊन त्यामध्ये समितीच्या वतीने विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रिया झिंजुर्डे, भारत आरगडे, विकास बोर्डे, अरुण वल्ले, गणेश लांडे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, जयश्री कुटे, शीतल झरेकर, सुनीता जोशी, सोमनाथ गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक राहुल आठरे यांनी केले. आभार कॉ. भारत आरगडे यांनी मानले.

240821\img-20210822-wa0044.jpg

नेवासा तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने शारदा फौंडेशनच्या सहकार्याने आगळावेगळा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता.

Web Title: We will stand behind you, brother