शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीत पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: August 2, 2014 01:02 IST

कुळधरण : पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण भरल्याने ओव्हरफ्लोचे पाणी भीमा नदीत सोडल्याने नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

कुळधरण : पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण भरल्याने ओव्हरफ्लोचे पाणी भीमा नदीत सोडल्याने नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र अचानक सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गाने विविध भागातील नदीपात्रातील वाळू उपसा करणाऱ्या बोटी, जलपर्णी वाहत येऊन कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलाला अडकल्या आहेत.भीमा नदीतील पाणी आटल्याने कर्जत तालुक्यातील भीमाकाठच्या सिद्धटेक, खेड, गणेशवाडी, दुधोडी, भांबोरा, औटेवाडी आदी गावांना पाणी टंचाई जाणवत होती. मात्र सध्या पात्रात सोडलेल्या पाण्याच्या विसर्गाने धोक्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण भरल्याने ३५ हजार क्युसेकने भीमा पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी सतत वाढत आहे. सिद्धटेक, खेड, गणेशवाडी भागातील अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप अचानक वाढलेल्या पाण्यात बुडाले आहेत. तसेच पाईप वाहून गेले आहेत.वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात शिरूर, दौंड आदी भागातील अनेक वाळू उपसा करणाऱ्या बोटी वाहून आल्या आहेत. खेड, गणेशवाडी परिसरातील नदीपात्रात जलपर्णीने व्यापले होते. मात्र वेगाच्या प्रवाहाने जलपर्णी वाहत येऊन खेडनजीकच्या पुलाला अडकल्या आहेत. यामध्ये १० ते १२ बोटींचाही समावेश आहे.(वार्ताहर)लिलाव धारकांच्या बोटीखेडजवळच्या भीमा नदीवरील पुलाला अडकलेल्या बोटी राजेगाव (ता.दौंड) येथील लिलाव धारकांच्या आहेत. नदी पात्रात पानवनस्पती व बोटी अडकल्याने प्रवाहाला अडथळे येत आहेत. गावासाठी धोकादायक परिस्थिती नाही. बोटी तसेच पाईप काढण्याचे काम सुरू आहे. नदीकाठच्या अकरा गावांनी सतर्क राहून प्रशासनाला वेळोवेळी माहिती द्यावी.-जयसिंग भैसडे, तहसीलदार