प्रत्येक जिल्ह्यात वक्फ मंडळाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:27+5:302020-12-24T04:19:27+5:30

श्रीरामपूर : महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे उर्दूत भाषांतर करावे व प्रत्येक जिल्ह्यात वक्फ मंडळाचे कार्यालय सुरू ...

Waqf Board in each district | प्रत्येक जिल्ह्यात वक्फ मंडळाचे

प्रत्येक जिल्ह्यात वक्फ मंडळाचे

श्रीरामपूर : महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे उर्दूत भाषांतर करावे व प्रत्येक जिल्ह्यात वक्फ मंडळाचे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी मुस्लीम ओबीसी संघटनेच्या पदाधिका-र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. हज यात्रेकरूंसाठी लावण्यात आलेले सर्व प्रकारचे कर रद्द करण्यात यावेत तसेच उच्च न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिम आरक्षण त्वरित लागू करावे, या मागण्यांचा समावेश पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनाही या पत्राच्या प्रत पाठविण्यात आल्या आहेत.

अल्पसंख्याकांच्या सर्व कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी नेमण्यात यावे. अल्पसंख्याक कल्याण समिती गठित करावी, विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती द्यावी, वक्फ मालमत्तेची जिल्हावार मोजदाद करून त्यावरील अतिक्रमण हटवावे, अल्पसंख्याक विभागाला ५ हजार कोटी रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे आणि यशदामार्फत मिळणारे प्रशिक्षण अल्पसंख्याकांसाठी तात्काळ सुरू करावे या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष फय्याज बागवान, शफीक बागवान, हारुण बागवान, अतिक बागवान, अनीस तांबोळी, अहमद रंगरेज, शफीक आतार, साजिद मणियार, रशिद रंगरेज, आसिफ बागवान आदींच्या पत्रावर सह्या आहेत.

--

Web Title: Waqf Board in each district