कामरगावला ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:53+5:302021-07-29T04:21:53+5:30

नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. त्याचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ...

Village security system implemented in Kamargaon | कामरगावला ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

कामरगावला ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

नगर तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. त्याचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव आंधळे होते. प्रास्ताविक सरपंच तुकाराम कातोरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप होते. ते म्हणाले की, नगर जिल्ह्यात सर्वप्रथम नऊ वर्षांपूर्वी हिवरेबाजारला ही योजना सुरू झाली. त्याचे फलित चांगले दिसल्याने गावोगावी ही यंत्रणा सुरू होत असून कामरगावला ५०० फोनने जोडले असून तालुक्यात तो उच्चांक आहे.

या प्रसंगी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, उपसरपंच संदीप लष्करे, ग्रा.पं. सदस्य संदीप ढवळे, ग्रा.पं. सदस्य गणेश साठे, शिवा सोनवणे, अनिल आंधळे, हाबू शिंदे, पोपट ठोकळ, राम नानेकर, विद्या महापुरे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल, गुप्त वार्ता विभाग प्रमुख रावसाहेब खेडकर, प्रा. मारुती आंधळे, माजी सरपंच गेनू चौरे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धांत आंधळे आदी उपस्थित होते.

Web Title: Village security system implemented in Kamargaon