विखे-पिपाडा एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:49 IST2019-10-05T13:48:20+5:302019-10-05T13:49:51+5:30

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले़ 

Vikhe-pipada together | विखे-पिपाडा एकत्र

विखे-पिपाडा एकत्र

राहाता : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी शुक्रवारी एकाच व्यासपीठावर आले़ 
शिर्डी मतदारसंघातून विखे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला़ त्यानंतर राहाता येथे विखे यांनी विजय संकल्प मेळावा घेतला़ यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे, भाऊसाहेब वाकचौरे, शालिनी विखे, नगराध्यक्षा ममता पिपाडा उपस्थित होते. पिपाडा म्हणाले, मला विखे यांच्या व्यासपीठावर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील़ पण विरोध करताना दिवसा एक आणि रात्री एक अशी भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणार आहे़

Web Title: Vikhe-pipada together