शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये पावसाने घेतला दोघांचा बळी

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

अहमदनगर/राहुरी : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नगर शहर, परिसरासह राहुरी तालुक्यात वांबोरी, सडे, उंबरे, ब्राम्हणी येथे शेकडो घरांची पडझड झाली़

अहमदनगर/राहुरी : अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नगर शहर, परिसरासह राहुरी तालुक्यात वांबोरी, सडे, उंबरे, ब्राम्हणी येथे शेकडो घरांची पडझड झाली़ शेकडो झाडे वादळामुळे पडली़ वांबोरी येथे राजेश खाकळ (वय-१२) हा मुलगा पत्रा लागून मयत झाला़ तर नगर तालुक्यातील खंडाळा येथे अण्णा बाळू दातीर (वय ५५) खडी क्रेशरची भिंत अंगावर पडून मयत झाला. सडे व ब्राम्हणी येथे चार जण जखमी झाले़ वांबोरी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचे दहा खोल्यांचे पत्रे दूर अंतरावर जाऊन पडले़ नूतन सहकारी सोसायटी व महेश मुनोत विद्यालयाचे पत्रे उडून गेले़ प्रसाद शुगर वसाहतीचे पत्रे एक किलोमीटर अंतरावर उडून गेले़ पोपट पटारे यांच्या घराचे पत्रे उडून गेले़ वादळी पावसामुळे बहुतांश घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक लोक बेघर झाले़ खळवाडी येथे आजम शेख, अक्रम शेख, सुभाष येवले यांच्यासह शेकडो घरांचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे पडली. सडे येथे शिवाजी माळी यांच्या घरावर सुभाष माळी व मच्छिंद्र माळी यांच्या घराचे पत्रे उडाली़ या अपघातात शिवाजी माळी यांच्यासह तिघे जखमी झाले़ वादळात सडे परिसरात असलेल्या महादेववाडी परिसरात तीस घरांची पडझड झाली़ भीमराज दिवे, सुनील धोंडे, अरुण फाटक, एकनाथ आव्हाड, शीला खरात, माकर्स साळवे, उत्तम पवार, बबन दिवे यांच्या घराचे पत्रे उडून गेले़ नगर शहराला आणि भिंगारला पावसाने झोडपले. भिंगारला वादळी वार्‍यांमुळे पोलीस वसाहतीचे पत्रे उडाले. सायंकाळी उशीरा वादळी वार्‍यासह, वीजेच्या कडकडाटाने पावसाला सुरूवात झाली. यावेळी अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे उन्मळून पडली. पोलीस वसाहतीतील पाच पोलीस कर्मचार्‍यांचे संसार उघड्यावर पडले. नगर शहरालाही जोरदार पावसाने झोडपून काढले. शहरात सखल भागात पाणी साचले होते. (प्रतिनिधी)

नाशकात दोघांचा, रत्नागिरीत एकाचा मृत्यू

मुंबई : राज्यात मंगळवारी काही ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये दोघांचा आणि रत्नागिरीत वीज पडून एकाचा मृत्यू झाला़ रत्नागिरीत सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यभर ढगाळ हवामान असले तरी विदर्भात सूर्य आग ओकत होता. तेथील बहुतांशी शहरांचे तापमान ४३ अंशाच्या वर होते. राज्यात सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपूरीत होते. राज्यभर पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. त्यानुसार मध्य महाराष्टÑ, कोकण आणि मराठवाडयात पावसाने हजेरी लावली. सातारा, औरंगाबादमध्ये, पुण्याच्या लोहगाव भागात पडल्याची नोंद झाली. नाशिक तालुक्यातील नाणेगाव येथे समाधान दाते (२८) व पळसे येथे रूपाली आगळे (१८) या तरुणीचा वीज पडून मृत्यू झाला़ रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा धडाका सुरू केला असून सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत पाऊस बरसत होता. रत्नागिरीनजीक गोळप येथे चालत्या दुचाकीवर वीज कोसळून अनंत सीताराम बोल्ये (३९) हा ठार झाला. सर्वाधिक पाऊस लांजा आणि चिपळुणात झाल्याची नोंद आहे.