आजपासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:48+5:302021-06-22T04:15:48+5:30

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात ...

Vaccination of citizens below 18 years of age from today | आजपासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण

आजपासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण

१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी १ मेपासून १८ ते ४४ हा टप्पाही सुरू झाला होता; परंतु काही कारणास्तव तो बंद करण्यात आला होता. आता पुन्हा २२ जूनपासून १८ ते २९ या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय केंद्रांवर ही लस उपलब्ध असेल. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता १८ वर्षांपुढील सर्वांना लस घेता येणार आहे. लस जशी उपलब्ध होईल तशी ती नागरिकांना मिळेल. कोणीही केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of citizens below 18 years of age from today