नेवासा : टंचाईस्थितीमुळे तालुक्यासाठी मुळा व भंडारदरातून आवर्तनाची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती. त्यावर कार्यवाही करत उपमुख्यमंत्री पवार यांनी मुळा कालव्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. तीन दिवसात हे आवर्तन मिळेल, अशी माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी नेवासा फाटा रोडवर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी गडाख म्हणाले, यंदा खरिपासाठी कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेती पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जेथे पेरणी लागवड झालेली आहे तेथे पिके पाण्यावर आली आहे. भंडारदरा व मुळा धरणातील पाणीस्थिती उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन आवर्तनाची मागणी केली. नेवासा ते नेवासा फाटा मार्गावर दुतर्फा सुमारे २ हजार २०० झाडांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाच्या संरक्षणासाठी जाळी बसविण्यात आली आहे.ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, नेवाशाचे माजी सरपंच नंदकुमार पाटील, भाऊसाहेब मोटे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी हजर होते. नेवासा बुद्रूक व १३ गावातील शेतकऱ्यांसाठी गेल्या ४ वर्षाप्रमाणे यंदाही आ.गडाख यांनी जाहीर भूमिका घेऊन पाणी आणण्यासाठी प्रयत्न केल्याने या भागातील शेतकऱ्यांनी गडाख यांची भेट घेऊन आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)
तीन दिवसात ‘मुळा’चे आवर्तन
By admin | Updated: August 14, 2014 23:14 IST
उपमुख्यमंत्री पवार यांनी मुळा कालव्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत.
तीन दिवसात ‘मुळा’चे आवर्तन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}