खरबस यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST2021-06-01T04:16:25+5:302021-06-01T04:16:25+5:30

अकोले तालुका पत्रकार संघाच्यावतीने ऑनलाईन श्रद्धांजली सभा सोमवारी सायंकाळी पार पडली. कोरोनाच्या या वाईट काळात समाजातील सर्व घटकांना आधार ...

Tribute to Kharbas | खरबस यांना श्रद्धांजली

खरबस यांना श्रद्धांजली

अकोले तालुका पत्रकार संघाच्यावतीने ऑनलाईन श्रद्धांजली सभा सोमवारी सायंकाळी पार पडली.

कोरोनाच्या या वाईट काळात समाजातील सर्व घटकांना आधार देताना पत्रकारांनी स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण अनेक पत्रकार मित्रांना या काळात गमावले आहे. ते न भरून येणारे नुकसान आहे. एकमेकांसह स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे, प्रा. डी. के. वैद्य, हेमंत आवारी, भाऊसाहेब चासकर, अमोल वैद्य, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, अल्ताफ शेख, संजय शिंदे, अजय जाजू यांनी मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत आवारी यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव प्रा. चंद्रशेखर हासे यांनी केले.

Web Title: Tribute to Kharbas