वारीतील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:41+5:302021-07-27T04:21:41+5:30
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील राहुलदादा टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ...

वारीतील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील राहुलदादा टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वटवृक्ष, कडुलिंब, चिंच, भेंडी, गुलमोहराचे वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या वृक्षारोपणासाठी कोपरगावचे सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, केंद्रप्रमुख किशोर निळे, वारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वरद गर्जे, शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव कराळे, सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकर टेके, सुदाम टेके, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, सेक्रेटरी अशोक निळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, प्रकाश गोर्डे, सुवर्णा गजभिव, विवेक टेके, रामराव पाटील, सतीश शेटे, ताराचंद पडघडमल, रोहित टेके, फकीर टेके, बच्चू गायकवाड, गौतम डोशी, अशोक गजभिव, सतीश मैराळ, गणेश भाटी, अशोक बोर्डे, भास्करराव आदमने, पंडित वीर, चंद्रकांत पाटील, भरत गंगुले, अंगणवाडी सेविका शकुंतला टेके, तारामती टेके, वर्षा लकारे, अलका मेहेरे, छाया कोरके, कल्पना निळे, सारिका भड, विशाखा भालेराव, नूतन येशी, ज्योती टिक्कल, आशासेविका रोहिणी लोखंडे, योगिता पवार, शीतल गायकवाड, सविता वाघ, मदतनीस सुनीता जाधव, वैशाली सोनवणे, मनीषा महापुरे, कल्पना मोरे, शीतल पवार उपस्थित होते.
वृक्षारोपणासाठी छाया वडनेरे, दत्तात्रय चव्हाण, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, गोविंदा पोरे, पांडुरंग खाडे, प्रमोद दारकुंडे, निवृत्ती गोडे, सूरज टेके, स्वप्नील टेके, बिपीन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके यांनी परिश्रम घेतले.
...............