टायगर ग्रुपच्या वतीने नगरमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:53+5:302021-06-09T04:25:53+5:30

अहमदनगर : टायगर ग्रुपच्या वतीने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि आज ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नगर ...

Tree planting in town on behalf of Tiger Group | टायगर ग्रुपच्या वतीने नगरमध्ये वृक्षारोपण

टायगर ग्रुपच्या वतीने नगरमध्ये वृक्षारोपण

अहमदनगर : टायगर ग्रुपच्या वतीने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि आज ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नगर शहरात २ हजार वृक्षांचे रोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे म्हणाले, समाजात पर्यावरणसंबंधी जागृती होत असताना, पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. कोरोनाच्या संकट काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे अनेक झाडे नाहीशी झाली. झाडांची ही उणीव भरून काढण्यासाठी टायगर ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी टायगर ग्रुपचे उपनगर अध्यक्ष मनोज भोसले, केडगाव अध्यक्ष सोमा भोजने, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष पवन भिंगारदिवे, तुषार शिंदे, प्रतीक लिगडे, कृष्णा दांगडे, योगेश अंधारे, युवराज पचारणे, प्रफुल्ल ठोंबरे, सूर्या जाधव, सोनू भिंगारदिवे, संदीप जगताप, नादिर शेख, मिहीर ढसाळ, अवि मेढे, अरविंद कांबळे, दादा जंगम आदी उपस्थित होते.

................

०७ टायगर ग्रुप

Web Title: Tree planting in town on behalf of Tiger Group