एकाच रात्री तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST2021-05-24T04:20:01+5:302021-05-24T04:20:01+5:30

शहरातील वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये २१ मे रोजी घराचे कुलूप तोडून दोन मोबाइल फोन चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी जमील ...

Three burglaries in one night | एकाच रात्री तीन घरफोड्या

एकाच रात्री तीन घरफोड्या

शहरातील वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये २१ मे रोजी घराचे कुलूप तोडून दोन मोबाइल फोन चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी जमील इब्राहीम शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच रात्री संजयनगर भागांमध्ये एका गोदामामधील खिडकी उचकटून आरोपीने मोबाइल लांबविला होता. याशिवाय काझीबाबा रस्त्यावर एका घराचे कुलूप तोडून तिथून मंगळसूत्र चोरून लांबविले होते.

या दोन्ही घटनांमध्ये शकील शहा व इसाक शहा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. खबऱ्याकडून मदत मिळवून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर शहबाज सलीम शहा यास जेरबंद केले. आरोपी शहा याने तीनही घरफोड्याची कबुली दिली आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जोसेफ साळवी, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे, महेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

Web Title: Three burglaries in one night