खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:57+5:302021-07-26T04:20:57+5:30

साहील गुलशन पठाण (वय १८), वारसी गयासउद्दीन रजा शेख (वय १८) व हासीम हारून खान (वय २०, रा. तिघे ...

Three absconding accused in murder case arrested | खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरार आरोपी जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरार आरोपी जेरबंद

साहील गुलशन पठाण (वय १८), वारसी गयासउद्दीन रजा शेख (वय १८) व हासीम हारून खान (वय २०, रा. तिघे नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिर्डी येथे राजेंद्र आंतवन धिवर या मजुराचा खून झाला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने याआधी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, अविनाश प्रल्हाद सावंत, अमोल सॅलोमन लोंढे व अरविंद महादेव सोनवणे या चार आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपी मात्र फरार होते. हे आरोपी मालेगाव येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेड कॉस्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, रोहित येमुल, रणजित जाधव, सागर ससाणे, बबन बेरड यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

................................

फोटो २५ आरोपी

खुनाच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

Web Title: Three absconding accused in murder case arrested