मनसेच्या तालुका उपाध्यक्षाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST2021-07-07T04:26:27+5:302021-07-07T04:26:27+5:30

पुणतांबा : पुणतांबा (ता. राहाता) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका उपाध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात राहाता तालुका पोलीस स्टेशनला ...

Threat to MNS taluka vice president | मनसेच्या तालुका उपाध्यक्षाला धमकी

मनसेच्या तालुका उपाध्यक्षाला धमकी

पुणतांबा : पुणतांबा (ता. राहाता) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका उपाध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरोधात राहाता तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आमच्या नेत्याविरोधात आंदोलने करतो काय, असे म्हणत ललित शिंदे याने गणेश जाधव यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुणतांबा येथील जलस्वराज्य टप्पा २ योजनेंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करीत जलस्वराज्य टप्पा-२ कमिटीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा मनसेच्या वतीने दांडके हातात घेऊन आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे राहाता तालुका उपाध्यक्ष गणेश अशोक जाधव दिला हाेता. त्यामुळे जाधव यांना ललित सुरेश शिंदे याने आंदोलने करतो काय, तुला गावात राहायचे आहे का, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली, असे राहाता तालुका पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. राहाता पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मंडलिक यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राहाता तालुका नवनिर्माण सेनेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

Web Title: Threat to MNS taluka vice president