शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी

By admin | Updated: March 1, 2016 23:33 IST

अहमदनगर : ‘रेल्वेचा मोफत प्रवास करू दिला नाही, तर भारतात बॉम्बस्फोट घडविले जातील’, असा मजकूर असलेले धमकीचे पत्र मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास नगर स्थानकातील रेल्वे प्रशासनाच्या हाती पडले.

अहमदनगर : ‘रेल्वेचा मोफत प्रवास करू दिला नाही, तर भारतात बॉम्बस्फोट घडविले जातील’, असा मजकूर असलेले धमकीचे पत्र मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास नगर स्थानकातील रेल्वे प्रशासनाच्या हाती पडले. या पत्रामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. धमकीचा प्रकार खोडसाळपणा असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मंगळवारी दुपारी पोस्टमनच्या हातून रेल्वे मास्तर यांच्या नावे असलेले बंद लिफाफ्यातील पत्र रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाले. हे पत्र उघडल्यानंतर रेल्वे प्रशासनाची धांदल उडाली. रेल्वे मास्तर यांच्या नावे असलेल्या या पत्रात म्हटले आहे, अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी शिवसेना-भाजप या पक्षाशी संबंधित रोहिदास भालेराव आणि रामदास भालेराव हे रेल्वेतून प्रवास करीत आहेत. त्यांना तिकिटाबाबत कोणी अडवाआडवी केली तर संपूर्ण भारतात कुठेही बॉम्बस्फोट घडविले जातील. पत्राच्या खाली रोहिदास भालेराव असे नाव लिहिलेले आहे.‘खासदार दिलीप गांधी आणि भाजपा-शिवसेना आमदारांकडून सावध राहण्याबाबत कळविण्यात येत आहे’, असे पत्राच्या सुरवातीलाच म्हटले आहे. हे पत्र हाती पडताच रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुपारी स्थानिक गुन्हे शाखा, नगर पोलीस, बॉम्बशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. त्यांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची झडती घेतली. नगर रेल्वे स्थानकामधून जाणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची चौकशी केली. रेल्वे ब्रीज, ओव्हर ब्रीजवरही तपासणी केली. यामुळे दुपारी रेल्वे स्थानकावर एकच तारांबळ उडाली. दरम्यान रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी न्यायालयीन कामकाजासाठी बाहेरगावी होते. त्यामुळे रेल्वे पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक एस. डी. दिवटे यांनी रेल्वे स्थानकावरील परिस्थिती हाताळली. धमकीचे पत्र हा खोडसाळपणाचा प्रकार असून भालेराव यांच्या नावाचा पत्रात वापर करून ही धमकी दिली आहे. पत्र लिहिणारा व्यक्ती मनोरुग्ण असण्याची शक्यता असल्याचे दिवटे यांनी सांगितले. एखाद्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.