शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाली ठाण्यात शिवसेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:45 IST

अहमदनगर : महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिका-यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कोतवाली ठाण्यात ठिय्या ...

अहमदनगर : महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिका-यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कोतवाली ठाण्यात ठिय्या देत आंदोलन केले़ सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारनियमनाविरोधात येथील महावितरण कार्यालयात अधिका-यांना निवेदन देण्यासाठी गेले होते़ याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही महावितरण कार्यालयाबाहेर भारनियमनाविरोधात आंदोलन करत होते़ दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले तर घोषणाबाजी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कोतवाली पोलिसांनी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही जबरदस्तीने पोलीस वाहनात बसवून कोतवाली ठाण्यात आणले़ ठाण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निघून गेले़ शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मात्र ठाण्यासमोर ठिय्या देत आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणणा-या अधिकारी व पोलीस कर्मचा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली़ राठोड यांच्यासह सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा़ शशिकांत गाडे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, गणेश कवडे व कार्यकर्त्यांनी दोन ते अडीच तास ठिय्या दिला़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी ठाण्यात येऊन सेना पदाधिका-यांची माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ दरम्यान महावितरण कार्यालयात आंदोलन करणा-यांविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आले होते़ मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुणाविरोधातही अधिका-यांनी फिर्याद दिली नव्हती़