निमगावजाळी विश्रामगृहात चोरी रेस्टहाउसवर चोरट्यांनी केला हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:48+5:302021-06-30T04:14:48+5:30

याबाबत बबन बाबुराव ओहळ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.२७ ते २८ जूनच्या दरम्यान ...

Thieves clean hands at a rest house in Nimgaonjali Rest House | निमगावजाळी विश्रामगृहात चोरी रेस्टहाउसवर चोरट्यांनी केला हात साफ

निमगावजाळी विश्रामगृहात चोरी रेस्टहाउसवर चोरट्यांनी केला हात साफ

याबाबत बबन बाबुराव ओहळ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.२७ ते २८ जूनच्या दरम्यान निमगावजाळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने चार सिलिंग पंखे व नळाचे तीन कॉक असा ४ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

दुसऱ्या चोरीच्या घटनेबाबत रखमा साहेबराव जोशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. २४ जून रोजी दाढ खुर्द शिवारातील राहत्या घरासमोरून मध्यरात्री बजाज कंपनीची प्लँटीना (एम.एच. १७ बी.बी. ४२०२) ही १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दरम्यान, आश्वीसह परिसरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी दहशत निर्माण केली असून, मागील आठवड्यात आश्वी खुर्द येथे चार ते पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत, एका ठिकाणी चोरी करण्यात आली. एक दुचाकी चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले होते. त्या चोऱ्यांचा तपास सुरू असतानाच, निमगावजाळी व दाढ खुर्द येथे पुन्हा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Thieves clean hands at a rest house in Nimgaonjali Rest House