शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST

केडगाव : कोरोनाची भीती संपत नाही तोच नगर तालुक्यात चोरट्यांनी घबराट निर्माण केली आहे. जेऊर, वाळकी, गुंडेगाव येथे धाडसी ...

केडगाव : कोरोनाची भीती संपत नाही तोच नगर तालुक्यात चोरट्यांनी घबराट निर्माण केली आहे. जेऊर, वाळकी, गुंडेगाव येथे धाडसी चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी (दि.१७) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत अडीच तोळे सोने व रोख रक्कम ६ हजार रुपये लंपास केले आहेत.

महावितरण कंपनीच्या चौकातील अंतोन पाटोळे यांच्या घराचा दरवाजा तोडून ही चोरी झाली. पाटोळे कुटुंब जागे झाल्याने त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून चोरी करण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा श्रीधर तवले यांच्या वस्तीकडे वळविला. तिथे त्यांचा मुलगा राजू तवले जागा झाल्याने चोरट्यांनी तेथून पोबारा केला. चोरी करताना एका चोराला जबर दुखापत झाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस हवालदार रमेश थोरवे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

वाळकी येथील कापड दुकान फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाचे कपडे लांबविले. ही घटना बुधवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास घडली होती. चोरीची दुसरी घटना गुंडेगावातील हराळ मळा येथे घडली. किराणा दुकान फोडून १० हजार रुपये व १२ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण २२ मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि.१३) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. वाळकी, गुंडेगाव परिसरात चोरीच्या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वाळकीतील अमोल तुकाराम झोंड यांच्या कापड दुकानातील ७० प्रकारचे विविधरंगी कपडे एकूण १०७ नग कपडे चोरांनी लांबविले. याची किंमत १ लाख २३ हजार ११२ रुपये आहे. वाळकी येथे यापूर्वीही मोबाइल दुकान, स्वीट होम दुकान फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. गुंडेगावच्या हराळ मळा येथील नानासाहेब रंगनाथ हराळ यांचे किराणा दुकान मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकडसह दुचाकीची चोरी केली.

-----

वाळकीत हॉटेल फोडून दारूची चोरी

वाळकी येथील राजहंस हॉटेल फोडून चोरट्यांनी दारूच्या बाटल्या लंपास केल्या. दोन दिवसांपूर्वीच वाळकीत चोरीच्या घटना घडलेल्या असताना पुन्हा हॉटेल फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केले.