शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

..तर धनगर समाजाचा मुंबईला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

जामखेड : धनगर समाजासाठीच्या आदिवासी कल्याणच्या २२ योजना तातडीने लागू कराव्यात. धनगर समाजासाठीचे दोन वर्षांच्या काळातील दोन हजार कोटी ...

जामखेड : धनगर समाजासाठीच्या आदिवासी कल्याणच्या २२ योजना तातडीने लागू कराव्यात. धनगर समाजासाठीचे दोन वर्षांच्या काळातील दोन हजार कोटी रुपये गेले कोठे? वीस हजार घरेही बांधली नाहीत. यासर्व मागण्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास धनगर समाज न्याय्य मागण्यांसाठी मुंबई शहराला घेराव घालेल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची राहील, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे पडळकर यांनी सोमवारी सकाळी भेट देऊन अभिवादन केले. त्यांनी येथून सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील धनगर समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

पडळकर म्हणाले, धनगड व धनगर हे दोन समाज नाहीत तर एकच आहे. यापूर्वी या राज्यात धनगड समाज अस्तित्वात नाही, असे यापूर्वीच्या सरकारने सांगितले आहे. सरकार धनगर समाजाची बैठक घ्यायला तयार नाही. न्यायालयात खटला चालू आहे, तेथे वकील दिला जात नाही यावरूनच असे दिसते की हे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याचे टाळत आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्याच्या चाव्या काका-पुतण्याच्या हातात येतात त्यावेळी धनगर समाजावर अन्यायच होतो, अशीही टीका त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

धनगर समाजाच्या वेगवेगळ्या २२ मागण्यांकडेही राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. मुलांना विनाशुल्क इंग्लिश स्कूलध्ये प्रवेश मिळावा, वसतिगृहात राहण्यासाठी ठरवून दिलेले अनुदान मिळावे, सूतगिरणीचा प्रश्न सोडवावा, मेंढीच्या मांसाच्या निर्यातीबाबत निर्यातीसाठी प्रयत्न करावा, वनीकरण विभागाने तीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची ठिकाणे कुरण म्हणून मेंढ्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत आदी मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी पडळकर यांनी केले.