शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत पोरं हुशार!

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर पूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा

अशोक निंबाळकर, अहमदनगरपूर्वी शालेय जीवनातील महत्त्वाचा म्हणजे मॅट्रीक टप्पा ओलांडताना भले भले हुशार विद्यार्थी धापा टाकायचे. सत्तर, एेंशी टक्के गुणही त्यांच्यासाठी एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद देऊन जात. परीक्षेची काठिण्य पातळी तीच असतानाही आता टक्केवारीत भारंभार विद्यार्थी सहज नव्वदी पार करीत आहेत. यंदा राज्यातील तब्बल ६० टक्के मुलं ६० पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहेत.दहावीचा मंगळवारी (दि.१७) दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. बेस्ट आॅफ फाईव्हमुळे ही टक्केवारी फुगली आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेष श्रेणी मिळवणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. अवघ्या ७.४३ टक्के विद्यार्थ्यांना ४५ टक्क््यांपेक्षा कमी गुण आहेत.९० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांची संख्या ४० हजार ७९७ आहे. ८५ ते ९० टक्के मिळवणारे ६५ हजार ११७, ८० ते ८५मध्ये ९३ हजार ९६१, ७५ ते ८० मध्ये १ लाख २० हजार २१४, ७० ते ७५ मध्ये १ लाख ४५ हजार, ६५ ते ७० टक्क्यांमध्ये १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही आकडेवारी एकूण उत्तीर्णांच्या ४५ टक्के आहे. २ लाख विद्यार्थ्यांची मॅट्रीक ‘वारी’६० ते ६५ टक्क्यांमध्ये १४.४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची संख्या १ लाख ९७ हजार २१६ आहे. ४५ ते ६० टक्के गुण ३२.०३ टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले. या श्रेणीत सर्वाधिक ४ लाख ३८ हजार ४२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांखाली गुण मिळवणाऱ्यांची संख्या अवघी ७.४३ टक्के आहे. त्यात १ लाख १ हजार ७६४ जणांचा समावेश आहे. एकीकडे पोरं हुशार झाल्याचे दिसत असले तरी १ लाख ८१ हजार ६८ जण नापास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मॅट्रीकची ‘वारी’ करावी लागेल.