शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:35+5:302021-08-18T04:27:35+5:30

पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हापातळीवर निवड समिती असून, तत्पूर्वी शिक्षकांनी स्वत: भरून दिलेल्या माहितीची तालुकापातळीवर परीक्षण करण्यात येते. या पुरस्कारांसाठी प्रत्येक ...

The teacher will examine the proposal for the award | शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव तपासणार

शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव तपासणार

पुरस्कारांच्या निवडीसाठी जिल्हापातळीवर निवड समिती असून, तत्पूर्वी शिक्षकांनी स्वत: भरून दिलेल्या माहितीची तालुकापातळीवर परीक्षण करण्यात येते. या पुरस्कारांसाठी प्रत्येक तालुक्यातून ३ शिक्षकांच्या प्रस्तांवाचे परीक्षण करण्यात येते. शंभर गुणांच्या परीक्षणानुसार प्रत्येक तालुक्यातून तीन असे ४२, तर केंद्रप्रमुखांच्या आलेल्या प्रस्तावानुसारची नावे जिल्हास्तरावर पाठविण्यात येतात. दरम्यान, या पुरस्कारसाठी जिल्हापातळीवर २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत असून, त्यात मिळणारे गुण आणि तालुक्यात परीक्षात मिळणारे गुण यातून नावे अंतिम होणार आहेत.

जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षकांची निवड अंतिम झाल्यावर पोलीस पडताळणीनंतर संबंधित यादी ही विभागीय आयुक्तांच्या मान्यतेला पाठविण्यात येईल.

---------

या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असून, समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी हे उपाध्यक्ष आहेत, तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सचिव, उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती हे सदस्य, महिला आणि बालकल्याण समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील डीएड, बीएड कॉलेजच्या प्राचार्यांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून सामावेश आहे.

............

Web Title: The teacher will examine the proposal for the award