‘तक्षज्ञ'मध्ये शिक्षक-पालक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:06+5:302021-09-07T04:27:06+5:30

राहुरी : आरडगाव (ता.राहुरी) येथील तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वतीने शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन ...

Teacher-parent meet in ‘Taksajna’ | ‘तक्षज्ञ'मध्ये शिक्षक-पालक मेळावा

‘तक्षज्ञ'मध्ये शिक्षक-पालक मेळावा

राहुरी : आरडगाव (ता.राहुरी) येथील तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वतीने शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कॉलेज अनेक दिवस बंद होते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वेदांता फाउंडेशनचे प्रा. बाबासाहेब मुसमाडे होते. प्राचार्य जगदीश मुसमाडे व प्रशासन अधिकारी महेश मुसमाडे उपस्थित होते. तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मुसमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. जगदीश मुसमाडे यांनी कॉलेजमध्ये अभ्यासपूर्वक, अभ्यासेतर चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांना दिली.

यावेळी शिक्षक राहुल बोरुडे, सागर वाघ, सायली सौदागर, गौरी सूर्यवंशी, अफरोज सय्यद, संतोष अनाप, सोनाली शिरोळे, निकिता कार्ले, प्रियाली दरंदले आदी उपस्थित होते.

Web Title: Teacher-parent meet in ‘Taksajna’