शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा फास लटकवून शेतकऱ्यांचे प्रतीकात्मक आंदोलन

By admin | Updated: May 23, 2016 01:14 IST

अहमदनगर : दुष्काळी स्थितीत अल्प पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीगेट वेशीला कांद्याचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले.

अहमदनगर : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, दुष्काळी स्थितीत अल्प पाण्यावर घेतलेल्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिल्लीगेट वेशीला कांद्याचा फास लटकवून आक्रोश आंदोलन केले. यावेळी उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, राज्यसरकारने एकाधिकार पध्दतीने कांदा खरेदी करुन तो निर्यात करावा व कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. आंदोलनात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा वाढणाऱ्या आत्महत्येचा जीवंत देखावा सादर करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अ‍ॅड.कारभारी गवळी, पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, जालिंदर बोरुडे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीर बहादूर प्रजापती, दिलीप वाकळे, बाळासाहेब सुंबे, कान्हू सुंबे, ओम कदम, संजय सोंडकर, मंदाताई जरे, बाबासाहेब जरे, भानुदास आवारी आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारात भाव गडगडल्याने कर्ज काढून लावलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. कांद्याच्या भावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. चाऱ्याच्या स्वरुपात कांदा जनावरांपुढे टाकण्याची नामुष्की ओढवली असून सरकारने निर्णयात्मक पाऊल न उचलल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना कांद्याच्या कमी भावाच्या ओढवलेल्या संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घेऊन कांद्याला १५ ते २० रुपये किलो भाव देणे गरजेचे असल्याची मागणी सुधीर भद्रे यांनी केली. (प्रतिनिधी)