शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत संक्रांतीचा गोडवा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

कोविडमुळे गेल्या वर्षातील तब्बल आठ महिने साईनगरीच्या अर्थकारणाचा गाडा रुतलेला होता. येथे जवळपास साडेसातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत. गेल्या काही ...

कोविडमुळे गेल्या वर्षातील तब्बल आठ महिने साईनगरीच्या अर्थकारणाचा गाडा रुतलेला होता. येथे जवळपास साडेसातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिर्डीतील हॉटेल व अन्य उद्योग व्यवसायांना घरघर लागली आहे. त्यात कोविडमध्ये मंदिर बंदमुळे साईनगरीचे कंबरडेच मोडले. भाडोत्री हॉटेल किंवा दुकाने घेऊन पोट भरणारे भाडे न भरू शकल्याने कुटुंब कबिल्यासह आपापल्या गावी परतले आहेत. गेल्या महिन्यात साई मंदिर उघडले. मात्र, दहा वर्षांखालील व ६५वर्षांवरील व्यक्तींना दर्शन बंदी असल्याने गर्दीला आपोआपच ब्रेक लागला. कोविडमुळे रोज पंधरा ते वीस हजार भाविक दर्शन घेत आहेत. त्यातील बहुतांश जण दर्शन घेऊन परतत आहेत. संस्थानची दर्शन व्यवस्था उत्तम असली तरी काही गेट व द्वारकामाईसारख्या मंदिरामध्ये आवक जावक बंद झाल्याने भाविकांची गावातील वर्दळ कमी झालेली आहे. त्यामुळे अनेक हॉटेलला महिनाभरात भाविकांचा पदस्पर्शही झाला नाही. गुरुवारी व शनिवारी भाविकांची किरकोळ वर्दळ वाढल्याने ज्यांच्याकडे थोडेफार भाविक येतायेत. त्यांतून वीज बिल व कर्मचारी पगारही सुटायला तयार नाहीत, अशी व्यावसायिकांची स्थिती आहे.

थोडी गर्दी वाढून व्यवसायाची कोंडी फुटेल, अशी व्यावसायिकांना आशा असतानाच संस्थानने गर्दी नियंत्रित करण्यासाठी शनिवार, रविवार, गुरुवार व सुटीच्या दिवशी येथील पासेस काउंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ ऑनलाइन बुकिंग करून येणारांनाच या दिवशी दर्शन मिळणार आहे. ऑनलाइन पासेस काढणेही सर्वांनाच शक्य व सुकर नसल्याने अनेकजण साईदर्शनाचा मनसुबा रद्द करणार आहेत. मकर संक्रांतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे भाविकांच्या गर्दीला ब्रेक लागणार आहे.