शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीसाठी सुपा एमआयडीसीला आता रेल्वेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी झपाट्याने विकसित होत असून येथे कंपन्यांची संख्या वाढत आहे. येथील उत्पादित माल, कच्चा ...

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी झपाट्याने विकसित होत असून येथे कंपन्यांची संख्या वाढत आहे. येथील उत्पादित माल, कच्चा माल यांच्या वाढत्या वाहतूक खर्चावर मात करण्यासाठी एमआयडीसीला आता रेल्वेची गरज आहे. येथून अवघ्या १५ किमी अंतरावर असणाऱ्या रांजणगाव रोड येथून सुप्यापर्यंत सायडिंग लाइन टाकता येणे शक्य असून मालधक्का सुरू केल्यास येथील उद्योग आणखी वाढून रोजगार संधीतही वाढ होईल. त्यासाठी पाठपुराव्याबरोबरच राजकीय पाठबळ, संघटित मागणीचा रेटा, स्थानिक कार्यकर्त्यांबरोबरच एमआयडीसीच्या सहकार्याचीही गरज आहे.

जुन्या औद्योगिक वसाहतीबरोबरच विस्तारित एमआयडीसीत कारखाने वाढले असून लवकरच जपानी पार्कमध्येही नव्याने ३ कारखाने सुरू होणार आहेत. सध्या कॅरिअर मायडिया, मिंडा, केएसपीजी या विस्तारित एमआयडीसीतील कारखान्यांबरोबरच जुन्या औद्योगिक वसाहतीतील जाफा हा पशुखाद्य निर्मिती प्रकल्प, आम इंडिया, अकॉर्ड, गणराज इस्पात, ईपीटॉम, शंकेश्वर फूड प्रॉडक्ट अशा अनेक नामवंत कंपन्या कार्यरत आहेत. या कारखान्यांना लागणारा कच्चा माल रस्त्यावरून येतो. तसाच तयार झालेला माल ही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या माध्यमातून बाजारपेठेत पाठविला जातो. सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने वाहतूक खर्चातही वाढ झाली. कच्च्या मालाची वाहतूक, उत्पादन खर्च, नंतर माल बाजारपेठेत पाठविला जातो. त्यासाठीचा खर्च वाढल्याने परिणामी उत्पादित वस्तूची किंमत वाढण्यावर होतो.

त्यामुळे येथील एमआयडीसीसाठी रांजणगाव रोडपासून सायडिंग रेल्वे लाइन प्रकल्प होणे आवश्यक आहे. यामुळे देशाच्या कोणत्याही भागातून कारखान्यांसाठी लागणार कच्चा माल वाजवी खर्चात आयात करता येईल. तसेच उत्पादित माल तातडीने वेळेत कमी खर्चात बाजारपेठेत पाठविणे शक्य होईल, असे सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत यांनी सांगितले.

एमआयडीसी ते रांजणगाव रोड असे १५ किमीचे अंतरही कमी आहे. त्यासाठीचा खर्चही फारसा नाही. ही रेल्वे लाइन टाकणे सर्वांच्याच हिताचे ठरणार असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वाघुंडे बुद्रुकचे सरपंच संदीप वाघमारे, वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, कडूसच्या माजी सरपंच पूनम मुंगसे, उद्योजक संजय तरटे, आपधूपचे सरपंच अजिंक्य गवळी, वाळवणे गावचे उपसरपंच सचिन पठारे, अण्णासाहेब हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, वाघुंडे बुद्रुकचे माजी सरपंच संदीप मगर यांनी केली आहे.

----

रांजणगाव रोड ते सुपा एमआयडीसी या सायडिंग रेल्वे लाइनच्या कामासंदर्भात रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून या मार्गाचा सर्व्हे करण्यासाठी सूचना देण्यात येतील.

- सुजय विखे, सदस्य, अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

----

रांजणगाव रोड ते सुपा एमआयडीसी हा मालवाहतुकीसाठी उपयुक्त रेल्वे मार्ग तयार झाला आहे. एमआयडीसीचा आणखी झपाट्याने विस्तार होऊन अनेक बेरोजगार मित्रांना त्याद्वारे नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लागणारी मदत करण्यात येईल.

- नीलेश लंके, सदस्य, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ